राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा शिंदेंचा विचार, हालचाली सुरू – सूत्र

Retirement age : महाराष्ट्र राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.यामुळे राज्य शासन याबाबतचा शासन निर्णय केव्हा काढते? यावर सकारात्मक निर्णय केव्हा घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना किती Grauity मिळेल, पहा सविस्तर

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) 60 वर्षे करण्याची मागणी राज्य सरकारी बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मूळ पगार 8 हजारांनी वाढणार

केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती.

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना 20 लाखापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो. परिणामी 60 हजार कर्मचारी वर्गास सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो. तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते. निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

राज्य सरकारचे एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातील 3% कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होत असतात. राज्य सरकारी सेवेत पात्र होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे इतकी आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सेवेचा कार्यकाल अल्प मिळतो. सरकारला त्यांच्या अनुभवाचा फायदा घेता येत नाही.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास राज्य शासन अनुकूल असून लवकरच हा निर्णय घेण्यात येणार असून, या बातमीने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment