RTE 25% Admission : RTE’ प्रवेशाची नियमावली जाहीर! 1ली ते 8 वी पर्यंत (इंग्रजी माध्यम सह) मोफत शाळा प्रवेश मिळवण्यासाठी वाचा सविस्तर…

RTE 25% Admission : 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत.

RTE मधील बदलानुसार प्रवेशाची नियमावली शालेय शिक्षण विभागाने अंतिम केली आहे. त्यानुसार पहिलीत प्रवेश घेताना सुरवातीला घरापासून 1 किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळांची निवड करावी लागेल.

त्यानंतर शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि या दोन्ही प्रकारच्या शाळा तेवढ्या अंतरात नसल्यास स्वयंअर्थसहाय्यिता शाळेचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे.

विद्यार्थ्यांची नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे.

‘RTE’ अंतर्गत शालेय शिक्षण विभागाने शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. पण, एखाद्या पालकाला अनुदानित शाळेऐवजी त्यांच्या परिसरातील 1 KM अंतर वरील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना तसाही प्रवेश घेता येईल.

ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल आणि इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यिता शाळा असल्यास त्यांना त्याठिकाणी प्रवेश घेता येणार आहे.

परंतु, तत्पूर्वी शाळांचे मॅपिंग होईल आणि खरोखरच त्या विद्यार्थ्याच्या घरापासून अनुदानित किंवा सरकारी शाळा नसल्याची खात्री केली जाईल.

अपवादात्मक परिस्थितीत अनुदानित, सरकारी व स्वयंअर्थसहाय्यिता (इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा) शाळा विद्यार्थ्याच्या 1 किमी अंतरावर नसेल तर त्या विद्यार्थ्यांना 3 किमी अंतरावरील शाळा निवडता येईल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

RTE च्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक शाळा वगळण्यात आल्या आहेत. पण, एखादी शाळा पुढील काही वर्षात अल्पसंख्यांक झाल्यास आता ‘आरटीई’तून त्याठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे लागेल, असेही या नियमावलीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

RTE 25% प्रवेश बाबत नियम

RTE 25% प्रवेश प्रक्रिया करिता गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे पडताळणी समिती असेल, तसेच महापालिका स्तरावरही अशीच समिती नेमली जाणार आहे.

RTE 25 टक्के प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाकडे रेशनकार्ड/वाहन परवाना/वीज-टेलिफोन/प्रॉपर्टी टॅक्सचे बिल/आधार किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबूक यापैकी एक पुरावा असणे आवश्यक आहे.

जर पालक हे भाडे तत्वावर राहत असतील तर भाडेतत्त्वावरील पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार असायला हवा. भाडेकरार अर्ज भरण्यापूर्वीचा असावा व तो 11 महिने किंवा त्याहून अधिक काळाचा असणे गरजेचे आहे.

भाडेकराराची पडताळणी होईल आणि त्याठिकाणी पालक राहत नसल्यास प्रवेश रद्द होईल.

उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी) 2022-23 व 2023-24 या वर्षातील असावा.

तसेच जातीचा दाखला, दिव्यांग मुलासाठी जिल्हा शल्यचिकित्स, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 31 डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. दरम्यान, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्याने आरटीईतून प्रवेश घेतला असल्यास पुढील आठवीपर्यंतचे शिक्षण त्याला त्या परिसरातील शाळेत मोफत घेता येईल.

निवासाचा पत्ता, जन्मतारखेचा दाखला, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, फोटो आयडी किंवा दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होईल असे या नियमावलीत सांगितले आहे.

RTE 25% मोफत प्रवेश मिळवण्यासाठी शाळा रजिस्ट्रेशन कसे करावे ते येथे पहा.

येथे मार्गदर्शक सूचना पहा

RTE 25% प्रवेश प्रक्रिया बाबत टप्पे

  • आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी करणे
  • नवीन विद्यार्थी नोंदणी करणे
  • ऑनलाईन अर्ज
  • विद्यार्थ्यांची माहिती भरणे
  • ऑनलाईन अर्ज भरणे
  • आरटीई शाळा निवड करणे
  • भरलेल्या अर्जाची स्थिती पहा
  • लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया
  • प्रवेशपत्र उपलब्ध
  • कागदपत्रे तपासणी होते
  • शेवटी RTE 25% प्रवेश निश्चित केला जातो.

RTE 25% प्रवेश प्रक्रिया बाबत शाळांना सूचना पत्रक येथे पहा

RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2024-25 करिता लवकरच सुरू होणार असून त्याबाबत अपडेट कळवण्यात येईल.

Leave a Comment