खूशखबर ! आरटीई प्रवेश प्रक्रीया 2024-25 करिता अर्ज करण्यास मुदतवाढ, पहा शेवटची तारीख

RTE Admission 2024-25 : सन 2024-25 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक 17.05.2024 ते 31.05.2024 या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात सुरु करण्यात आलेली होती.

तथापि आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याच्या सुविधेस दिनांक 04.06.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे-1 यांनी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

सदरची मुदतवाढ ही अंतिम असून दिनांक 04.06.2024 नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही असे सदरील पत्रकान्वये पालकांना कळवण्यात आले आहे.

सदरील परिपत्रक आपण पुढे पाहू शकता.

Leave a Comment