कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पहा सविस्तर

7th Pay Commission : लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) वाढवला होता. महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे. त्यामुळे रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि मृत्यू उपदान यासह अन्य भत्त्यांमध्येही वाढ होण्याची अपेक्षा होती. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि अनेक भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे.

RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 करिता अर्ज करण्यास मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख

सरकारने सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू उपदानाची मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही वाढ 01 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

गरीबांच्या बजेट मध्ये आलेली नवीन maruti Fronks, फक्त 1 लाखात आणा घरी

1 जानेवारी 2024 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. यापूर्वी, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) ४ टक्क्यांनी वाढवण्यात आला होता, ज्यामुळे त्यांचा डीए ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. ग्रॅच्युइटी वाढीसंदर्भातील घोषणा ३० एप्रिल रोजी करण्यात आली होती, पण ७ मे रोजी ती थांबवण्यात आली होती. पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट १९७२ नुसार, एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या संस्थेत किमान पाच वर्षे सलग काम केलं असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मार्चमध्ये महागाई भत्त्यात वाढ यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मार्च महिन्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर डीए ५०% आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई पासून मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment