केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढला! राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कधी वाढणार? पहा अपडेट

यंदा संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. एक जून 2024 रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर, 4 जून 2024 रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.

या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महागाई भत्ता 46% वरून 50% झाला आहे, आणि परिणामी त्यांचा घरभाडे भत्ताही वाढला आहे.

पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक्स, वाय, झेड श्रेणीनुसार अनुक्रमे 27%, 18% आणि 9% घरभाडे भत्ता मिळत होता. आता हा भत्ता अनुक्रमे 30%, 20% आणि 10% झाला आहे.केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढल्यामुळे, आता महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कधी वाढणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवू शकते. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होणार आहे. याबाबतचा निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो असा अंदाज आहे.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर त्यांचा घरभाडे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एक ते तीन टक्क्यांपर्यंत वाढेल, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्याचा अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. राज्य कर्मचाऱ्यांना हा वाढीव भत्ता जून महिन्याच्या पगारासोबत मिळेल, परंतु तो जानेवारी 2024 पासून लागू असेल.यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा फरकही मिळेल आणि घरभाडे भत्ता तीन टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Leave a Comment