7th Pay Commission : EPFO च्या व्याज दर वाढीनंतर, आता सरकारी कर्मचाऱ्यांना देखील खूशखबर !!..

7th Pay Commission : केंद्र सरकार 2024 च्या पहिल्या सहामाहीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट देऊ शकतं. पुढील महिन्यात मार्चमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास डीए 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल. 7th Pay Commission EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक गुड न्यूज 7th Pay Commission पीएफ खातेधारकांना (PF Account Holder) यांना मोठं गिफ्ट देत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees Provident Fund Organisation) शनिवारी व्याजदरात मोठी वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. त्या घोषणेनुसार, पीएफच्या व्याजदर (PF Interest Rate) 8.25 टक्के करण्यात आला आहे. 2024 हे वर्ष निवडणूकीचे वर्ष आहे, या वर्षात पीएफवरील व्याज वाढ झाल्यानंतर आता सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) वाढीची घोषणा कधी होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार मार्च 2024 मध्ये महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी असेल, कारण त्यांना येणारा महागाई भत्ता तब्बल 50 टक्के होईल.

शासकीय मुद्रणालयात 10 वी पास वर भरती

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं (CBT) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी नवा व्याजदर जाहीर केला आहे. EPFO ने देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून व्याजदरात वाढ करुन 8.25 टक्के केला आहे. पीटीआयनुसार, पीएफ खातेधारकांना आता पूर्वीपेक्षा 0.10 टक्के जास्त व्याज मिळणार आहे. गेल्या वर्षी 28 मार्च रोजी EPFO ने 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. पीएफ व्याजदरात वाढ झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्येही डीए वाढीची अपेक्षा वाढली आहे.

या जिल्ह्यात 13 हजार 462 घर कुलांना मंजुरी

सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवते आणि जानेवारी-जून सहामाहीसाठी महागाई भत्ता मार्च 2024 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणेची शक्यता आहे. दरम्यान, लवकरच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के आहे, केंद्र सरकारनं जर महागाई भत्त्यात वाढ केली, तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 50 टक्के होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment