दररोज 7 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा महिना 5000 रुपये; जाणून घ्या ही सरकारी योजना

आता बऱ्यापैकी लोक सध्याच्या काळात गुंतवणुकीवर जास्त भर देत आहेत. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक खूप महत्वाची आहे. सरकारी योजना अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दीड लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो. Atal pension Yojana

APY अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी आधार आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वृद्धापकाळ कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आरामात पार पडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी ते आपल्या कमाईतून बचतही करतात. अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतात. जेणेकरुन त्यांना त्यांच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. अशा वेळेस पेन्शन उपयोगी पडते, म्हणजेच ते नियमित उत्पन्नाचे साधन बनते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करुन तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकता. जेणेकरुन कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सरकार चालवत असलेली अटल पेन्शन योजना या बाबतीत खूप लोकप्रिय आहे.

राज्य शासकीय कर्मचारी आश्वाशीत प्रगती योजनेत सुधारणा करणे संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

APY मध्ये 5000 रुपयांपर्यंत पेन्शन ची हमी

तुम्हाला जर उतार वयात आनंद घेयचा असेल, तर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणे नक्की फायदेशीर ठरेल. ही पेन्शन योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करुन गुंतवणूक करु शकता. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 ते 5,000 रुपया पर्यंत पेन्शन मिळू शकते. याचा अर्थ निवृत्तीनंतर तुमचे नियमित उत्पन्न निश्चित आहे. Atal pension Yojana मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयाच्या 60 वर्षापर्यंत मुदत ठेव आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

मुदत किती असावी?

APY अटल पेन्शन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर तुमची पेन्शन सुरु होते. जर तुम्हाला हे दुसऱ्या प्रकारे समजले तर, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो. लक्षात ठेवा की आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

महिन्याला 5000 रुपये पेन्शन कशी मिळणार?

अटल पेन्शन योजना मध्ये गुंतवणूक करायची असल्यास वय किती असावे तसेच इतर अटी आपण पहिल्या आहेत. आपण किती गुंतवणूक केल्यावर तुम्हास दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे ते पाहू, समजा सध्या तुमचे वय 18 वर्षे आहे, तर दर महिन्याला तुम्हाला 210 रुपये जमा करावे लगतील म्हणजेच या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर 20 वर्षांनी किंवा वयाच्या 60 वर्षानंतर तुम्ही दरमहा 5000 पेन्शन घेऊ शकता.

जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला या कालावधीत या योजनेत दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. या योजने अंतर्गत तुम्हाला 10000 रुपये पेन्शन देखील मिळू शकते. त्या करिता जशी तुमची गुंतवणूक अधिक असेल त्याप्रमाणे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. Atal pension Yojana

Leave a Comment