उद्या 12वी बोर्डाचा निकाल, या वेबसाईटवर पहा

Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 ही परीक्षा घेण्यात आली होती. Maharashtra 12th Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळविलेले गुण मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. मंगळवार दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 1.00 वाजता 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहेत.

HSC Result 2024 चा निकाल असा तपासा

  • विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट maharesult.nic.in पुढे देण्यात आलेल्या वेबसाईट्सवर जावे लागेल.
  • पुढे Results पेजवर क्लिक करा.
  • Maharashtra 12th Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
  • लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर नमूद करा आणि सबमिट करा. पुढे 12 वीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.आता तुम्ही निकाल डाउनलोड करुन त्याची प्रिंट आउट काढून घेऊ शकता.

या अधिकृत वेबसाईट्सवर पहा महाराष्ट्र बोर्डाच्या HSC (बारावी) चा निकाल

mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahahsscboard.in

http://result.digilocker.gov.in

http://results.targetpublications.org

Leave a Comment