मुख्यमंत्री वयोश्री योजना, आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000/- रुपये, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Mukhyamantri Vayoshri Yojna : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस 05 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली, अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविली जाणार असून, प्रत्येकाच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा केले जातील. या योजनेसाठी 480 कोटी रुपयांच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते. मात्र ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल. राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दिड कोटींच्या दरम्यान आहे. त्यामध्ये अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने पिडीत सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

असा मिळणार लाभ

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थींना 3000 हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना उद्देश

ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
  • तसेच या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये मर्यादेत असायला हवे.

Leave a Comment