या शासकीय कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी च्या पगारापासून दरमहा 5000/- रूपये ठोक भत्ता दिला जाणार दि. – 05/02/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

Government employees Update : राज्यातील पुढील दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदरील शासन निर्णय हा मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्या संदर्भात हा शासन निर्णय आहे.

मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून, येथे राज्याचा प्रशासकीय कारभार तसेच धोरणे ठरविली जातात. त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता शासन आता असे आदेश देत आहे की, मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील (मंत्रालय खुद्द) लिपिक-टंकलेखक संवर्गास दरमहा रु. 5000/- (रुपये पाच हजार फक्त) इतक्या रक्कमेच्या ठोक भत्त्याचे प्रदान करण्यात येत आहे, त्या संबंधित शासन निर्णय पुढे पाहा.

शासन निर्णय पहा

Leave a Comment