1 एप्रिल पासून बदलणार आयकर सबंधित हे 5 नियम

New income Tax Rules : 1 एप्रिल 2024 पासून नवीन वित्तीय वर्ष सुरू होत आहे. कराशी संबंधित नवीन बदल देखील या दिवसापासून लागू होतात. यावेळी, नवीन आणि जुन्या कर प्रणालीशी संबंधित नियम देखील 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

आर्थिक वर्ष 2024-25 हे वित्तीय वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे आयकर रिटर्न देखील भरू शकता. आयकर विभागानं यासाठी ऑफलाइन फॉर्मही जारी केला आहे. तुम्ही हा फॉर्म इन्कम टॅक्स वेबसाइटवरूनही डाउनलोड करू शकता. परंतु, 1 एप्रिल पासून आयकराशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

हे पहा 👉मतदान कार्ड नसले तरीही करता येणार मतदान

नवीन आर्थिक वर्ष म्हणजे 2024-25 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. हा दिवस वैयक्तिक वित्ताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवसापासून कर संबंधित अनेक बदल लागू होतात.

अर्थसंकल्पात केलेल्या अनेक घोषणांची अंमलबजावणीही 1 एप्रिलपासूनच केली जाते. यावेळीही टॅक्स स्लॅब, विमा पॉलिसी आणि स्टँडर्ड डिडक्शनशी संबंधित काही नवीन नियम 01 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

हे कर बदल काय आहेत आणि त्यांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल ते सविस्तरपणे पाहू.

हे पहा 👉1 एप्रिल पासून राज्यात स्मार्ट मीटर, लाईट बिल येणार अर्धे

नवीन कर व्यवस्था डीफॉल्ट असेल

तुम्ही जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था यातील निवड केली नसेल, तर तुम्ही 1 एप्रिलपासून आपोआप नवीन कर प्रणालीकडे जाल.

नव्या करप्रणालीत तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागणार नाही. परंतु, जर तुम्हाला गुंतवणूक करून कर वाचवायचा असेल, तर जुनी कर व्यवस्था तुमच्यासाठी चांगली असू शकते.

हे पहा 👉 महावितरण मध्ये 5,347 जागांसाठी भरती

स्टँडर्ड डिडक्शन चा लाभ मिळणार

यापूर्वी, 50 हजार रुपयांची मानक वजावट फक्त जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होती. आता नवीन कर प्रणालीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत, 50 हजार रुपयांवर कर सूट उपलब्ध आहे, म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शननंतर तुम्हाला 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

काही लोकांना या सूटचा इतका फायदा होतो की आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत सूट देऊन त्यांच्यावर कोणताही कर आकारला जात नाही. ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना कलम 87A अंतर्गत 12,500 रुपयांपर्यंत सूट मिळते.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभ

जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि कमी रजा घेत असाल तर तुम्हाला रजेच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशावर जास्त कर सूट मिळणार आहे. यापूर्वी, एखाद्या निमसरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या उर्वरित रजेच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतल्यास, फक्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त होती. मात्र, आता ही मर्यादा 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

हे पहा 👉 जमीन/घर/प्लॉट/शेत जमिनीचा नकाशा अश्या प्रकारे पहा ऑनलाईन मोबाईल वर

आयकर फॉर्ममध्ये बदल

आयकर विभागाकडून दोन फॉर्म जारी केले जातात. ITR-1 ला सहज आणि ITR-4 सुगम म्हणून ओळखलं जातं. यातही थोडा बदल करण्यात आला आहे. आता रिटर्न भरणाऱ्याला त्याच्या अकाऊंट टाईपसह मागील वर्षातील सर्व बँक खात्यांची माहिती उघड करावी लागतील. नवीन प्रणाली डीफॉल्ट करण्यात आली आहे. ITR-4 च्या करदात्यांना नवीन प्रणालीमधून बाहेर पडण्यासाठी फॉर्म 10-IEA दाखल करावा लागेल.

लाईफ इन्शुरन्स पॉलिसी परिपक्वता उत्पन्नावर नवीन कर नियम

आता जीवन विमा पॉलिसीमधून मिळालेल्या परिपक्वता उत्पन्नावर कर भरावा लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जी काही पॉलिसी जारी केली गेली आहेत ती या नियमाच्या कक्षेत येतील. मात्र, हा कर फक्त त्या लोकांनाच भरावा लागेल ज्यांचे एकूण प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

अधिक माहिती येथे वाचा

Leave a Comment