खूशखबर ! राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार 7,000/- रू. वाढीव पगार

State employees Salary News : तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे; कारण जुलै महिन्यात पगारात तब्बल 7000/- रुपयांनी वाढ होणार आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये 4% महागाई भत्ता वाढ होऊन एकूण महागाई भत्ता 50% करण्यात आलेला आहे; त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील माहे जुलै पासून महागाई भत्ता वाढ होईल असे वृत्त आहे.

असा वाढून मिळेल 7000/- रू. पगार

जर तुमचे मूळ वेतन 25,000/- रुपये असेल, आणि 4% महागाई भत्ता वाढ झाल्यास जुलै महिन्यात 1000/- रुपये वेतन वाढेल, आणि मागील माहे जानेवारी ते जुलै महिन्याच्या फरकासह राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै च्या वेतनात एकूण 7000/- रुपये वाढीव पगार मिळेल.

आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्यानुसार आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.

Leave a Comment